14 वर्षीय मुलीवर अत्याचार करताना मॅनेजरचा मृत्यू! क्षमता वाढवण्यासाठी सप्लिमेंट्स घेतली अन…
Breaking Crime News : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला. धक्कादायक कारण आले समोर.
मुंबई : मुंबईत हादरवून टाकणारी घटना घडली आहे. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, मृत आरोपी गुजरातमधील एका डायमंड फॅक्ट्रीचा मॅनेजर होता. पीडित अल्पवयीन मुलगीही याच कारखान्यात काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘इंडियन एक्सप्रेस’मधील वृत्तानुसार, ही घटना 2 नोव्हेंबर रोजी घडली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मॅनेजर अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत होता. पीडितेच्या कुटुंबात तिच्या आईशिवाय तिचे अर्धांगवायू (पॅरालाइज्ड) झालेले वडील आणि बेरोजगार भाऊ यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनेजर आर्थिक मदत बंद करण्याची धमकी पीडितेला देत होता. तिला ब्लॅकमेल करून तो मुंबईत घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीचे पीडित मुलीच्या कुटुंबाशी चांगले संबंध होते. अनेकदा तो वडिलांना भेटायलाही जात असे. कुटुंबाला मदत होईल म्हणून आईच्या दबावामुळे 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आरोपीच्या फॅक्ट्रीत काम करू लागली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, , 29 ऑक्टोबर रोजी आरोपी पीडित मुलीच्या घरी गेला आणि आपल्या कुटुंबासह मुंबईला जात असल्याचे सांगितले. पीडित मुलीला आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो का, अशी विचारणा त्याने तिच्या कुटुंबीयांना केली. यानंतर 2 नोव्हेंबरला तो पीडित मुलीसोबत मुंबईला गेला. त्यानंतर, हॉटेलमध्ये आरोपीने 14 वर्षांची पीडिता आपली मुलगी असल्याची माहिती दिली. चेक इन करण्यासाठी त्याने बनावट आधार कार्ड दिले.
चौकशीत पोलिसांना समजले की, मॅनेजरने तिला फॅक्ट्रीतच त्रास देण्यास सुरुवात केली होती. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास कुटुंबाला मदत करणे बंद करेन आणि सर्व पैसे परत करावे लागतील, अशी धमकी तो तिला देत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबरला आरोपीने हॉटेलच्या रूममध्ये लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी सप्लिमेंट्स घेतल्या होत्या आणि अत्याचारादरम्यान तो बेशुद्ध झाला. त्यानंतर तरुणीने हॉटेल कर्मचाऱ्यांना बोलावले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
आरोपीला मुंबईतील जेजे रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Manager dies while abusing 14-year-old girl
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study