Breaking News | Sangamner: तालुक्यातील आंबी खालसा फाटा येथे गुप्ती हातात घेऊन मोठ्याने आरडाओरडा करणाऱ्यास अटक.
घारगाव : संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा फाटा येथे गुप्ती हातात घेऊन मोठ्याने आरडाओरडा करणाऱ्यास घारगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि. ११) दुपारी ४ वाजताच्या सुमारास अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिस हवालदार नारायण ढोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष लालू कहाणे (रा. आंबी खालसा, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत म्हटले आहे, नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत आंबी खालसा फाटा येथे हॉटेल लक्ष्मीसमोर संतोष कहाणे हा मोठ्याने आरडाओरडा करून हातात गुप्ती घेऊन लोकांमध्ये दहशत पसरवताना पोलिसांच्या निदर्शनास आला.
पोलिसांनी त्यास ताब्यात घेत गुप्ती जप्त केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार डी. एस. मरभळ हे करीत आहेत.
Web Title: Man arrested for carrying contraband