भाचीचे लग्न आटोपून घरी परतत असताना घोटी सिन्नर महामार्गावर अपघातात मामाचा मृत्यू – Accident
नाशिक | Nashik: घोटी सिन्नर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात (Accident)भाऊसाहेब शांताराम टोचे वय ४० यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ट्रकने भाऊसाहेब यांच्या जीपला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने या धडकेत जीपमधून घरी परतत असलेल्या भाऊसाहेब यांचा मृत्यू झाला आहे. जीपचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
भाऊसाहेब हे आपल्या भाचीच्या लगनाला गेले होते. लग्नसमारंभ आटोपून ते घरी जाण्यासाठी निघाले असताना वाटेतच काळाने घाला घातला. शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
घोटी सिन्नर हायवेवरील भरवीर फाटा येथे घोटीकडून सिन्नर येथे जाणाऱ्या ट्रकने जीपला धडक दिली. सिन्नरहून घोटीकडे भाऊसाहेब जीपमधून जात होते. लग्न आटोपून घरी जाणाऱ्या भाऊसाहेब यांच्यावर काळाने घाला घातला आणि त्यांचं कुटुंब पोरक केलं. ट्रकचालक फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी जुन्देर, कोरडे अधिक तपास करीत आहे.
Web Title: Mama died in an accident on Ghoti Sinnar Highway