Home अहिल्यानगर अहिल्यानगर: सोशल मीडियावर मैत्री करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर: सोशल मीडियावर मैत्री करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Breaking News | Ahilyanagar Crime: २ वेळा आरोपीने शिर्डी येथे नेत अत्याचार केला.

Making friends on social media and undermining abused

श्रीरामपूर: शहरातील एका महाविद्यालयातील साडेसतरा वर्षे वयाच्या अल्पवयीन विद्यार्थीिनी बरोबर मैत्री करत तिला शिर्डी येथे नेऊन अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा वाशिम जिल्ह्यातील आहे.

आरोपीचे नाव गजानन देशमुख असे आहे. त्याने विद्यार्थिनी बरोबर जानेवारी २०२५ सोशल मीडियाद्वारे ओळख करून घेतली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना फोन नंवर दिले. दोघांचेही फोनवर संपर्क सुरू झाले. त्याचे रूपांतर मैत्री मध्ये होत गेले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून आरोपी विद्यार्थिनीशी संपर्कात आला. विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर भेटायला आला, आपण शिर्डी येथे दर्शनासाठी जाऊ असे तो म्हणाला, मात्र विद्यार्थिनीने प्रारंभी त्याला नकार दिला होता. मात्र आरोपीने तिच्याकडे आग्रह करत मैत्रीचे कारण पुढे केले. अखेर तिला शिर्डी येथे घेऊन जात एका लॉजवर अत्याचार केला. आरोपीने महाविद्यालयात त्यानंतर पुन्हा भेट घेत मोबाइलमध्ये चित्रित केलेले फोटो आई वडील, नातेवाइकांना व भावाला दाखविण्याची धमकी दिली. त्यामुळे भेदरलेल्या मुलीचा गैरफायदा घेत आरोपीने पुन्हा तिला शिर्डी येथे नेले. तेथे दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

पीडित विद्यार्थिनीने शहर पोलिस ठाण्यात आरोपी गजानन देशमुख याच्याविरुद्ध अत्याचारप्रकरणी फिर्याद नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत घटनेचे गांभीर्य जाणून तातडीने तपासाची चक्रे फिरवली, मंगळवारी रात्री उशिरा त्याला जालना येथून अटक करण्यात आली. आरोपी हा जालना येथे नोकरी करीत होता. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरेखा देवरे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. आरोपीने मुली सोबतचे त्याचे फोटो तिच्या भावाला पाठविले होते. त्यामुळे कुटुंब तणावामध्ये गेले होते. आरोपीने मुलीशी लग्न लावून देण्याचा आग्रह कुटुंबीयांकडे धरला होता, अशी माहिती तपासी अधिकारी देवरे यांनी दिली.

Breaking News: Making friends on social media and undermining abused

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here