संगमनेर: डॉक्टरचा १६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट
Breaking News | Sangamner Crime: १६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक, डॉक्टरला न्यायालयाने कोठडी.
संगमनेर: १६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी, संगमनेरमधील प्रतिष्ठित डॉ. अमोल संताजी कर्पे (वय ४७ वर्ष) याला संगमनेरच्या अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी सोमवारी १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. आता पोलीस चौकशीतून या अत्याचार प्रकरणी नेमकी काय माहिती समोर येते याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.
रविवारी रामनवमीच्या दिवशी पहाटे डॉ. कर्पे याने आपल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. रविवारी पहाटे सुमारे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयात आलेल्या डॉ. कर्पे याने अल्पवयीन मुलीच्या तब्येतीची विचारपूस करत तिला तू जरा बाहेर ये असे सांगून रुग्णालयाच्या टेरेसवर नेले होते. तेथे त्याने या मुली सोबत लज्जास्पद वर्तन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
त्यानंतर डॉ. कर्पे तेथून पसार झाला होता. दरम्यान पीडित मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याने व तेथे मोठा वाद निर्माण झाल्याने ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी देखील घटनास्थळी घाव घेतली होती. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तात्काळ आरोपी डॉक्टरच्या शोधासाठी तपास यंत्रणांना अलर्ट केले होते. डॉ. कर्पे याला नाशिकच्या अंबड भागातून नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्या
दरम्यान डॉ. कर्पे याला या गुन्ह्यामध्ये संगमनेर पोलिसांनी रविवारी रात्री ११ वाजता अटक करत सोमवारी उशिराने न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयात व न्यायालयाच्या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान न्यायालयामध्ये सहाय्यक सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी आरोपी डॉ. कर्पे याने केलेला गुन्हा हा त्याला कायद्याचे ज्ञान असताना केलेला असून त्याने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा व स्त्री अत्याचाराचा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय तपासासाठी आरोपीला १० दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी सरकार आणि आरोपीच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर आरोपी डॉ. कर्पे याला दहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फरहाना पटेल करत आहेत.
Web Title: Major update on doctor’s sexual assault case against 16-year-old girl