Home संगमनेर संगमनेरातील अवैध कत्तलखान्यावर एलसीबीचा मोठा छापा

संगमनेरातील अवैध कत्तलखान्यावर एलसीबीचा मोठा छापा

Breaking News | Sangamner Crime: गोवंश कत्तलीचा व्यवसाय बिनधास्त सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड २७०० किलो गोमांस, वाहने, शस्त्रांसह ३४.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Major raid by LCB on illegal slaughterhouse in Sangamner

संगमनेर:  संगमनेर शहर आणि तालुका पोलीस अवैध कत्तल खान्यांविरोधात कितीही दावा करत असले, तरी प्रत्यक्षात शहरात गोवंश कत्तलीचा व्यवसाय बिनधास्त सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), अहिल्यानगर यांच्या विशेष पथकाने संगमनेर शहरात कारवाई करत २७०० किलो गोमांस व विविध वाहने, शस्त्रांसह ३४ लाख ८४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे संगमनेर शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एलसीबीच्या तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमजम कॉलनी, गल्ली क्र. ०९ येथे छापा टाकला. येथे हाजी मुदस्सर कुरेशी आणि नवाज जावेद कुरेशी हे काही अन्य इसमांच्या मदतीने गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याचे आढळून आले. पथकाच्या कारवाईदरम्यान ८ ते ९ इसम कत्तल करताना सापडले. मात्र, त्यांनी आडोशाचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. एलसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आलाः २७०० किलो गोमांस, २ महिंद्रा बोलेरो पिकअप वाहने, १ अशोक लेलंड ‘बडा दोस्त’ वाहन, ५ दुचाकी वाहने, ४ इलेक्ट्रिक वजन काटे, लोखंडी सुरे व कुऱ्हाडी, २ मोबाईल फोन असा एकूण मुद्देमालाची किंमत अंदाजे ३४,८४,४०० रुपये इतकी आहे.

घटनास्थळीन फरार झालेल्यांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गु. र. नं. ६००/२०२५ अंतर्गत खालील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे: भारतीय दंड संहिता (बीएनएस) कलम २७१, ३२५, ३(५) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) चे कलम ५ (क), ९ फरार आरोपींची नावे हाजी मुदस्सर कुरेशी, रा. संगमनेर (फरार), नवाज जावेद कुरेशी, रा. संगमनेर (फरार), फईम कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात), अक्रम कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) समीर कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) इतर ४ ते ५ अज्ञात इसम संगमनेरसारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तलीसारखा अवैध व्यवसाय सुरू असताना स्थानिक पोलीस प्रशासनाला याची माहिती नव्हती, हे विशेष चिंतेचे कारण आहे. एलसीबीच्या पथकाने ही कारवाई करून शहर पोलिसांच्या हलगर्जीपणाचे गारूड फोडले असून, अशा घटनांवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे.

Breaking News: Major raid by LCB on illegal slaughterhouse in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here