या कारणामुळे महाविकास आघाडी कोसळेल: केंद्रीय मंत्री रामदास आठवले
अहमदनगर | Ahmednagar: संजय राउत यांच्या मागणीने महाविकास आघाडीमध्ये लवकरच मतभेद होऊन सरकार कोसळेल असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
सोनिया गांधी या कॉंग्रेसच्या अध्यक्षा तर राहुल गांधी हे नेते आहेत. यामुळे युपीए चे अध्यक्षपद शरद पवार यांना देण्याची मागणी शिवसेना नेते संजय राउत करत आहे. हे योग्य नाही यामुळे यातून मतभेद होऊन महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याचे मत केंद्रीय मंत्री यांनी व्यक्त केले आहे.
रामदास आठवले हे नगरच्या सरकारी विश्रामगृह येथे सोमवारी रात्री थांबले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या सरकारमध्ये बिघाडी जाणार आहे महाविकास आघाडी अशी चारोळी त्यांनी यावेळी केली. हे सरकार लवकरच पडणार आहे. कॉंग्रेसचा जर अपमान होत असेल तर त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीबरोबर न राहता सरकारचा पाठींबा काढून घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
Web Title: Mahavikas government will collapse Ramdas Athavale