राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, आरोग्यमंत्र्याचे संकेत
Maharashtra Lockdown: राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने सरकार पुन्हा लॉकडाऊन वाढणार का? याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे. राज्यात १५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू केलेले आहेत. तर काही जिल्ह्यात आधीच लॉकडाऊन जाहीर केलेला आहे.
१५ मे पर्यंत निर्बंध असल्याने अवघे काही दिवस बाकी असल्याने राज्यात निर्बंध शिथिल करणार असे प्रश्न लोकांच्या मनात पडले आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संकेत दिले आहेत. राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता आहे.
बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि इतर सहकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती त्यांनी दिली आहे. राज्यात अनेक निर्बंध लागू केलेले आहे यात कोणत्या गोष्टींना सूट द्यायची की यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल.
Web Title: Maharashtran Lockdown is likely to increase till May 31