विधानपरिषद: महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, जयंत पाटलांना धक्का
Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024: महाविकास आघाडीतील मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव यांचा विजय.
मुंबई : राज्यात शुक्रवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. या विधान परिषदेच्या निवडणुकीत ११ जागांसाठी तब्बल १२ उमेदवार रिंगणात उतरले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने झाले. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूने आमचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावा केला जात होता. त्यामुळे नेमका कोणाचा उमेदवार पराभूत होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, या निवडणुकीच्या निकालात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीतील मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. तर शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे.
विधान परिषदेमध्ये महायुतीचे 9 विजयी उमेदवार
भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. योगेश टिळेकर 26, अमित गोरखे – 22, पंकजा मुंडे – 26, परिणय फुके 26 आणि सदा भाऊ खोत यांना 26 मते मिळालीत. शिंदे गटाच्या भावना गवळी 24 आणि कृपाल तुमाने 25 आणि अजित पवार गटाचे राजेश विटेकर 23 आणि शिवाजीराव खर्गे 24 मते मिळाली आहेत.
माझी १२ मतं मला मिळाली असून काँग्रेसची काही मतं फुटली असल्याची प्रतिक्रिया शेकापचे जयंत पाटील यांनी सांगितले.
Web Title: Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study