राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज कमालीची वाढ
मुंबई | Maharashtra Corona Update Today : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून तब्बल ४० हजारांचा टप्पा पार केला आहे. आज तब्बल 40 हजार 925 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर 14, 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आजच्या रुग्ण संख्येने ४० हजारांचा टप्पा ओलांडल्याने चिंता वाढली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आज 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 87 हजार 505 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत आज शुक्रवारी 20 हजार 971 रुग्णांची नोंद झाली आहे. प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
Web Title: Maharashtra Corona Update Today 40k