राज्यात प्रथमच कोरोना B.A 4 आणि B. A 5 व्हेरियंटचे सात रुग्ण, धास्ती वाढली- Maharashtra Corona Update
Maharashtra Corona Update | मुंबई: महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामुळे राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत भर पाडणारा अहवाल समोर आला आहे. ओमिक्रॉनच्या B.A 4 व्हेरियंट आणि B. A 5 या व्हेरियंटनं राज्यात डोके वर काढले आहे. राज्यात हा पहिल्यांदाच संसर्ग आढळून आला आहे. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. पुण्यात या दोन्ही व्हेरियंटचे एकूण ७ रुग्ण आढळून आले आहेततसेच दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५२९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, राज्य सरकारनंही चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मास्क वापरण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केलं होतं.
Web Title: Maharashtra Corona Update omicron B.A 4 and B.A 5