शरद पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर, अकोले व नगरमधून हे उमेदवार
Maharashtra Assembly Election 2024 NCP Sharad Pawar Second list: राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर.
मुंबई: राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
दुसऱ्या यादीमध्ये एकूण २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ४५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसरी यादी समोर आली आहे.
दुसऱ्या यादीमध्ये अकोल्यामधून अमित भांगरे यांना तर अहिल्यानगर शहरातून अभिषेक कळमकर यांना उमदेवारी जाहीर करण्यात आली आहे. एरंडोलमधून सतिश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गंगापूरमधून सतिश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पर्वतीमधून आश्विनी कदम, बीडमधून संदीप क्षीरसागर, माळशिरस उत्तम जाणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची दुसरी यादी
एरंडोल – सतीश अण्णा पाटील
गंगापूर – सतीश चव्हाण
शहापूर – पांडुरंग बरोरा
भूम-परांडा – राहुल मोटे
बीड – संदीप क्षीरसागर
आर्वी – मयुरा काळे
बागलान – दीपिका चव्हाण
येवला – माणिकराव शिंदे
सिन्नर – उदय सांगळे
दिंडोरी – सुनीताताई चारोसकर
नाशिक पूर्व – गणेश गिते
उल्हासनगर – ओमी कलानी
जुन्नर – सत्यशील शेरकर
पिंपरी – सुलक्षणा शिलवंत
खडकवासला – सचिन दोडके
पर्वती – अश्विनीताई कदम
अकोले – अमित भांगरे
अहिल्यानगर शहर – अभिषेक कळमकर
माळशिरस – उत्तम जानकर
फलटण – दीपक चव्हाण
चंदगड – नंदिनीताई कुपेकर
इचलकरंजी – मदन कारंडे
Web Title: Maharashtra Assembly Election 2024 NCP Sharad Pawar Second candidate list
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study