Home महाराष्ट्र महाराष्ट्र निवडणूक २०१९: भाजपाकडून शिवसेनेला नवी ऑफर

महाराष्ट्र निवडणूक २०१९: भाजपाकडून शिवसेनेला नवी ऑफर

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून आठवडा झाला तरी शिवसेनेला व भाजपला  सत्ता स्थापनेचा फार्मुला निश्चित करता आला नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी अडवून बसलेले आहे. यासाठी लोकसभा निवडणुकीच्या चर्चेचा दाखला देत आहे. मात्र शिवसेनेला मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी स्पष्ट केलं आहे. पुढील पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. यानंतर भाजपाने शशिवसेनेला आणखी एक ऑफर दिली आहे.

मुख्यमंत्री मिळणार नाही पण उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होऊ शकतो अस भाजपाने प्रस्तावात म्हंटले आहे. भाजपने शिवसेनेला १३-२६ चा फार्मुला दिला आहे. शिवसेनेला १३ मंत्रिपद तर २६ भाजपला मंत्रीपद असू शकतात. त्यात शिवसेनेला चार मंत्रिपद शिवसेनेला देण्याच्या तयारीत नाही. महसूल, नगरविकास, अर्थ, गृह हे खाती आपल्याकडेच ठेवतील.

उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला आल्यास त्यावर लगेच आदित्य ठाकरेंची वर्णी लावू नये असा मतप्रवाह आहे. त्याऐवजी जेष्ठांचा मान राखत सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे यांना संधी द्यावी. दोन अडीच वर्षानंतर उपमुख्यमंत्री पद आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवावे.

Website Title: Maharashtara Election Result 2019 shivsena proposal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here