Home अहमदनगर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची महापूजा, अहमदनगरचे ‘हे’ दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची महापूजा, अहमदनगरचे ‘हे’ दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

आषाढी एकादशीनिमित्ताने आज पहाटे मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची शासकीय महापूजा.

Mahapuja of Sapatnik Vithuraya by Chief Minister

पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्ताने आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मानाचा वारकरी म्हणून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील काळे दांपत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला.

भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे हे दाम्पत्य गेल्या 25 वर्षापासून पंढरपूरची पायी वारी करत आहेत. आज त्यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. विठ्ठलाची पूजा करण्याचा सर्वात आधी मान मिळाल्याने आम्ही धन्य झालो, असं भाऊसाहेब काळे म्हणाले. तर बा विठ्ठला… तुझ्या आशीर्वादाने सर्व सुरळीत होऊ दे, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला घातलं.

आज पहाटेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत नगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे यांना शासकीय पूजेचा मान मिळाला.

भाऊसाहेब काळे हे 25 वर्षापासून वारी करत आहेत. देवगड ते पंढरपूर भास्करगिरी महाराज यांच्या सोबत काळे दांपत्य पंढरीची वारी करतात. भाऊसाहेब काळे व्यवसायाने शेती करतात. काल आठ तास दर्शन रांगेत काळे दांपत्य उभे होते.

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा झाल्यानंतर सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत भरत शेठ गोगावले, मंत्री दीपक केसरकर, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील तसेच मानाचे वारकरि श्री व सौ भाउसाहेब काळे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काळे दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Mahapuja of Sapatnik Vithuraya by Chief Minister

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here