अकोले: आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जा – मधुकरराव नवले
आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जा – मधुकरराव नवले
अकोले : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर , सचिन तेंडूलकर यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून चिकाटी व आत्मविश्वासाने स्वत:तील सामर्थ्याने सर्वात पुढे रहा. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे असे प्रतिपादन अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले यांनी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘युवा संवाद ‘ अंतर्गत मार्गदर्शन करताना केले.
परीक्षा म्हणजे स्वत:ला तपासण्याची एक संधी असते. धैर्य व आत्मविश्वास व धाडस असेल तर यश निश्चित मिळेल असेही ते पुढे म्हणाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयांची परीक्षा अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मनोबल वृद्धी साठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरास सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या अल्फोन्सा डी यांनी केले. यावेळी विभागप्रमुख प्रा. पांडुरंग गुंजाळ , प्रा. स्मिता पुंड, प्रा. कडलग , प्रा. आहेर, प्रा. कुडेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा.कुसुम वाकचौरे यांनी मानले.
वाचा लेख – प्रेमाला अंत नाही, वर्षभर (रोजच) व्हेलेंटाईन. संपादकीय: अजित गुंजाळ
Website Title: Madhukarrao Navale Confront the confidence to exam
संपूर्ण बातम्यासाठी पहा: संगमनेर न्यूज व अकोले न्यूज
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
Get Latest Marathi News, Marathi Batmya Today Live & Marathi News Live from Politics, Sports, Entertainment News, Sangamner Taluka News, Akole Taluka News, Marathi Batmya Live and मराठी बातम्या लाइव from all cities of Maharashtra.