Home नाशिक धक्कादायक! पत्नीचे अश्लील व्हिडियो बनविले अन धमकी देत डान्सबारमध्ये…..

धक्कादायक! पत्नीचे अश्लील व्हिडियो बनविले अन धमकी देत डान्सबारमध्ये…..

Breaking News | Nashik Crime: पतीनेच पत्नीचे अश्लील व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल केल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली.

made a pornographic video of his wife and threatened her in a dance bar

नाशिक: पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी हादरवून टाकणारा घटनाक्रम समोर आला आहे. पतीनेच पत्नीचे अश्लील व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल केल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पत्नीला ब्लॅकमेल करत तिला नवऱ्यानेच डान्सबारमध्ये नाचण्यास भाग पाडण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

अधिक माहिती अशी की, नाशिकच्या हिरावाडीमध्ये ही अत्यंत विचित्र घटना घडली आहे. आरोपी पतीने पत्नीला आधी गुंगीचे औषध दिले. पत्नी शुद्धीत नसतानाच पतीने स्वत:च्या मोबाईलमध्ये घरात तिचे काही अश्लील व्हिडिओ काढले. पत्नी शुद्धीवर आल्यानंतर तुझे हे अश्लील व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी आरोपी पतीने दिली.

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पती वेळोवेळी आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ करायचा असा आरोप पीडित महिलेने केला आहे. एवढेच नाही तर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पतीने आपल्याला जबरदस्तीने डान्सबारमध्ये नाचण्यास भाग पाडले असा गंभीर आरोप पत्नीने केला आहे.

पीडितेच्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलिसात पती आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.

पतीने इतकं विचित्र कृत्य करण्यामागील नेमकं कारण काय आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच यापूर्वी त्याने अशाप्रकारे नकळतपणे त्याने आधीही पत्नीचे व्हिडीओ शूट केले आहेत का? त्याने असे व्हिडीओ शूट करुन आधी कोणाला पाठवले आहेत का? याचाही शोध पोलीस घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणातील तपशील ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

Breaking News: made a pornographic video of his wife and threatened her in a dance bar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here