Home नाशिक लक्झरी बस 200 फुट दरीत कोसळून भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू

लक्झरी बस 200 फुट दरीत कोसळून भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू

Breaking News | Nashik Accident: सापुतारा घाटात खाजगी लक्झरी बस 200 फुट दरीत कोसळून भीषण अपघात.

Luxury bus plunges into 200-foot gorge in horrific accident Five people died

बोरगाव:  नाशिक-गुजरात महामार्गावरील सापुतारा घाटात खाजगी लक्झरी बस 200 फुट दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली.

दरम्यान, या बसमधील प्रवासी नाशिकहून देवदर्शन आटोपून गुजरातकडे देवदर्शनासाठी चालले होते. त्यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. या बस अपघातात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी प्रवासी मध्य प्रदेशमध्ये राहणारे आहेत. .

रतनलाल देविराम जातव (४१), बोलाराम पोसाराम कुसवा (५५), गुहीबेन राजेशभाई यादव (६०), बिजेंद्र बादल यादव (५५), कमलेश भाई यादव (६०, सर्व राहणार मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज (रविवार) पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४५ जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात इतका भीषण होता की बस दरीत कोसळल्याने बसचे दोन तुकडे झाले आहेत. तसेच बसमधील जखमी २१ प्रवासी यांना शामगव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर गंभीर जखमी २४ यांना अहावा येथे दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Luxury bus plunges into 200-foot gorge in horrific accident Five people died

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here