अहमदनगर: चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष; २३ लाखांची फसवणूक
Ahmednagar News: मुलीला चित्रपटात मुख्य भूमिका देतो, असे सांगून वेळोवेळी २३ लाख रुपये उकळले. पण, मुलीला चित्रपटात भूमिका दिली नाही. पैसे परत न करता त्याबदल्यात कार देण्याचा बनाव केल्याचा प्रकार उघडकीस.
अहमदनगर: मुलीला चित्रपटात मुख्य भूमिका देतो, असे सांगून वेळोवेळी २३ लाख रुपये उकळले. पण, मुलीला चित्रपटात भूमिका दिली नाही. पैसे परत न करता त्याबदल्यात कार देण्याचा बनाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दोघांना अटक केली.
राजेश भगवान पवार (वय ३३ वर्षे, रा. चोळी तांडा, ता. कंधार, जि. नांदेड) व अमित अरविंद देशमुख (रा. बीड बायपास, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत शिरीषकुमार नारायण कदम (रा. भगवान बाबा चौक, निर्मलनगर, सावेडी, अहमदनगर, मूळ रा. जामखेड) यांनी फिर्याद दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शिरीषकुमार कदम यांची २०१६ मध्ये राजेश भगवान पवार याच्यासोबत ओळख झाली. त्याने कदम यांच्या मुलीची चित्रपटासाठी निवड केली. चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्यांना मार्च २०१९ मध्ये ओतूर (जि. पुणे) येथे बोलावण्यात आले. ते मुलीला घेऊन ओतूरला गेले. आरोपीने पवार या एक दिवस शूटिंग केले व पुढील शूटिंगसाठी पैशांची मागणी केली. बनावट कागदपत्रे तयार करून कदम यांच्याकडून रोख, चेक व फोन पेव्दारे वेळोवेळी २३ लाख रुपये घेतले. पण, मुलीला चित्रपटात भूमिका दिली नाही. त्यानंतर २३ लाखांच्या बदल्यात कार देण्याचे आरोपीने मान्य केले. त्याने कदम यांना बुधवारी (दि. १ नोव्हेंबर) नगर येथील आरटीओ कार्यालयासमोर बोलावून घेतले. मात्र, कदम यांना शंका आली. म्हणून त्यांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क केला.
कोतवाली पोलिसांनी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. त्यात वरील आरोपी अलगद अडकले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, तनवीर शेख, सुजय हिवाळे, अभय कदम, सलीम शेख, रियाझ इनामदार, संदीप थोरात, सोमनाथ राऊत यांनी केली..
Web Title: lure of acting in a movie 23 lakh fraud
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App