घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ
नवी दिल्ली: देशात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ (LPG Cylinder Price Hike) झाली आहे. १४.२ किलो वजनाचा घरगुती वापराचा गॅस सिलिंडरचा दर ५० रुपयांनी वाढला आहे. यामुळे दिल्लीत या सिलिंडरचा दर आता १,०५३ रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईत दर १०५२.५० पोहोचले आहे.
ही दरवाढ आजपासून ६ जुलै पासून लागू झाली आहे. तर ५ किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडर १८ रुपयांनी महागला आहे. दरम्यान, १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ८.५० कपात करण्यात आली आहे.
Web Title: LPG Cylinder Price Hike today 50 rupees