झोपेच्या गोळ्या देऊन दाबला प्रियकराचा गळा, मृतदेह बॅगमध्ये भरून नेला निर्जनस्थळी
Breaking News | Kolhapur Crime: लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना.
कोल्हापूर: लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवासी बॅगेतून मृतदेह कारने निर्जनस्थळी आणून तो नष्ट करण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपयशी ठरला. याप्रकरणी सुनीता सुभाष देवकाई (रा. खोपोली, जि. रायगड) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. गजेंद्र सुभाष पांडे (३८, रा. जिंतूर, जि. परभणी), असे खून झालेल्याचे नाव आहे. बुधवारच्या या खुनाचा उलगडा गुरुवारी रात्री झाला.
गजेंद्र व सुनीता यांच्यात प्रेम होते. गजेंद्रने लग्नास नकार दिला, घेतलेले पैसेही परत केले नाहीत. या रागापोटी त्यास खोपोली येथे झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या. सुनीता व अमित पोटे (रा. सुळे, ता. आजरा) यांनी गजेंद्रचा गळा आवळून खून केला.
मृतदेह निर्जनस्थळी नेताना आरोपींनी पेट्रोल, हरभऱ्याचा कोंडा सोबत घेतला. गाडी मुमेवाडीजवळ थांबवून मृतदेह झुडुपाजवळ नेला. परिसरात हवालदार बाजीराव कांबळे, कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील गस्तीवर असताना हा प्रकार समोर आला.
Web Title: lover’s throat was choked with sleeping pills, the body was packed in a bag and taken to a deserted place
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study