प्रेमास विरोधाच्या भीतीने प्रेमियुगलाने केले विष प्राशन
पुणे: नोकरी करत असताना प्रेमसंबंध निर्माण झाले परंतु या प्रेमाला विरोध होईन या भीतीने दोघांनी विष प्राशन केले त्यात तरुणीचा मृत्यू झाला तर तरुणाचा जीव वाचला.
याप्रकरणी मुलीच्या वडिलानी उत्तमनगर पोलिसांत फिर्याद दिली असून या तरूणाविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची २५ वर्षाची मुलगी एका कंपनीत कामाला होती. या दरम्यान तिचे एका तरूणाबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले झाले. यांनतर तरुणाने ती असलेली नोकरी बदलली तरी त्यांच्या प्रेमसंबंध कायम होते. दोघांनीही आपल्या घरी सांगितले नाही तरी सुद्धा आपल्या प्रेमाला विरोध होईल असे या तरुणीला वाटत होते. त्यामुळे त्यांनी विष प्राशन करून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तरुणी ही मयत झाली असून तरुण मात्र बचावला आहे. त्याच्या विरोधात आत्महत्याप्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Lovers poisoning for fear of opposing love