Home अहमदनगर अहमदनगरचा तरुण आणि पुण्याची तरुणी दोघांचेही मृतदेह लॉजवर आढळले

अहमदनगरचा तरुण आणि पुण्याची तरुणी दोघांचेही मृतदेह लॉजवर आढळले

Pune Crime: प्रेमीयुगलांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर.

Lovers committed suicide by hanging themselves in the lodge

पुणे: अहमदनगरचा तरुण आणि पुण्याची तरुणी दोघांचेही मृतदेह पुण्यातील वाघोली येथील एका लॉजवर आढळले आहेत. या प्रेमीयुगलांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. कोमल सुनील बर्के (वय-२०, वर्षे रा.चंदननगर,खराडी,पुणे) आणि सचिन गोकुळ शिंदे (वय-२१ वर्षे, सध्या रा खराडी.नेहरु कॉलनी,भिंगार,अहमदनगर) असं आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाचे नाव आहे.

वाघोलीतील एका लॉजवर प्रेमीयुगुलाने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आलीय. काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घडना उघडकीस आली. प्रेमप्रकरणातून दोघांनीही आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील २० वर्षी मुलीचे मूळचा अहमदनगरच्या असलेल्या २१ वर्षी मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. दोघेही सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लॉजवर आले होते. सायंकाळी सहा वाजता ते खोली सोडणार होते. मात्र वेळ झाल्यानंतरही ते बाहेर न आल्याने लॉजमधील कामगारांनी तरुणाच्या मोबाईलवर संपर्क साधला.

तरुणाने फोन न उचलल्याने कामगार खोलीजवळ गेले. त्यांनी दरवाजाची बेल वाजवली. तेव्हा दरवाजा बंद नसल्याचं लक्षात आलं. दरवाजा ढकलल्यानंतर आत दोघांनीही गळफास घेतल्याचं दिसलं. लॉजच्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

तरुणी डीएमएलटीचं शिक्षण घेत होती. तर तरुण खासगी कंपनीत नोकरी करत होता. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे. पुढील तपास लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरू करत आहेत.

Web Title: Lovers committed suicide by hanging themselves in the lodge

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here