Home महाराष्ट्र धक्कादायक! प्रेमीयुगुलाची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! प्रेमीयुगुलाची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

एका प्रेमी युगुलाने एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार.

Lovers committed suicide by hanging themselves from the same tree

सोलापूर: सोलापूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळी सोलापुरात एका प्रेमी युगुलाने एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुलगी अपल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे.  सोलापूर जवळील कवठे गावात प्रेमी युगुलांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. दोन्ही कुटुंबात दु:खाचे वातावरण असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सुरज चव्हाण असे या घटनेत मुत्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सुरज हा मोहोळ तालुक्यातला रहिवासी आहे. गेल्यावर्षी त्यांचं प्रेमाचं सूत जुळलं होतं. पण कुटुंबियांचा याला विरोध होता.

मिळालेल्या माहितीनुसार,  या घटनेतील मृत मुलगी ही मोहोळ तालुक्यात असलेल्या आपल्या मामाच्या गावी मागच्या वर्षी सुट्टीत गेली होती. त्यावेळी सुरज सोबत तिचे प्रेमाचे सूत जुळले. घरच्यांचा या प्रेम संबंधाला विरोध असल्याचे देखील समोर आले आहे. कुटुंबिंच्या विरोधानंतरही ते दोघेही कोणाचही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आज मात्र या दोघांनीही टोकाचे पाऊल उचलले. कवठे शिवारातील एका लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या आवस्थेत हे जोडपे आढळले. ही घटना तेथील नागरिकांना कळताच त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना घटनास्थळावर कॉलेजची एक बॅग, एक दुचाकी पोलिसांना आढळून आली आहे. गळफास काढून पोलिसानी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत घोषित केले आहे. या घटनेची नोंद सिविल हॉस्पिटल पोलीस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Lovers committed suicide by hanging themselves from the same tree

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here