Suicide: प्रेमी युगुलाची लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
Suicide Case: विवाहित प्रेमी युगुलाने खामगावातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना.
खामगाव (जि. बुलढाणा): विवाहित प्रेमी युगुलाने खामगावातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली.
बाळापूर तालुक्यातील कळंबी महागावचे विकास पंजाबराव सावळे (३२) आणि शीतल तायडे (३०) अशी या विवाहित प्रेमी युगुलाची नावे आहेत. त्यांनी बुधवारी सायंकाळी येथील एका लॉजमध्ये विवाहित जोडपे म्हणून राहण्यासाठी खोली बुकिंग केली. रात्री हे जोडपे लॉजमधील खोलीत झोपले.
लॉज मालकाच्या सांगण्यावरून कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला असता या जोडप्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास
सकाळी बराच वेळपर्यंत खोलीतून आले. कोणत्याही हालचाली जाणवल्या नसल्याने लॉजच्या कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. परंतु कोणत्याही हालचाली आढळून आल्या नाहीत. त्यामुळे
या घटनेतील विवाहितेला तीन मुले असल्याची माहिती समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी दोघांनी आत्महत्येचे स्टेटस ठेवल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होती.
Web Title: Lovers commit suicide by hanging themselves in the lodge
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App