Home अहमदनगर अनैतिक संबंधातून खून करणाऱ्या प्रियकरास जन्मठेप

अनैतिक संबंधातून खून करणाऱ्या प्रियकरास जन्मठेप

lover who commits murder in an immoral relationship

श्रीरामपूर | Murder: अनैतिक  संबंधात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीच्या मदतीने तिच्या पतीचा खून केल्याप्रकरणी पढेगाव येथील प्रियकर विशाल प्रदीप तोरणे यास श्रीरामपूर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश महमंद नासीर एम. सलीम यांनी जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड ठोठाविला आहे.

मयत विकास यांचे बंधू अण्णासाहेब पावर यांनी ६ एप्रिल २०१८ रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीत म्हंटले आहे की, ५ एप्रिल २०१८ रोजी माझा भाऊ विकास हा विशाल तोरणे याच्या घरी आपल्या पत्नीस शोधण्यासाठी गेला असता तेथे वाद झाले त्या दोघांनी अनैतिक संबंधात अडथळा नको म्हणून विकासला लाकडाने मारहाण करत त्याचा घात केला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी या प्रकरणाचा तपास केला. या खटलात पोस्टमोर्टन अहवाल महत्वाचा ठरला. सरकारी पक्षाच्या वतीने १३ साक्षीदार तपासण्यात आले.

Web Title: lover who commits murder in an immoral relationship

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here