Home ठाणे तीन वर्षापूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत गळा चिरून हत्या

तीन वर्षापूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत गळा चिरून हत्या

Breaking News | Thane Crime: एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Love marriage three years ago, suspecting the wife's character

ठाणे :  एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची गळा चिरून हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  पती पत्नीच्या (नात्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असात. यामध्ये एकमेकांवर असलेला विश्वास या नात्याला अधिक घट्ट करतो. विश्वास नसल्यास त्या नात्याला काहीच अर्थ उरत नाही. अन् त्याचा दुर्दैवी शेवट होतो. अंबरनाथमधील  या घटनेत देखील नात्यात विश्वास नसल्यानं मोठा आघात झाला आहे.

अंबरनाथमधील  पालेगाव परिसरातील एका रहिवासी संकुलात मंगळवारी ही घटना घडली.  पत्नीची हत्या केल्यावर पती तेथून पसार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे या दाम्पत्याच्या एक वर्षाच्या चिमुकलीचं मायेचं छत्र मात्र हरपलं आहे.

मिळालेली माहिती अशी की,   पालेगाव परिसरातील पार्श्व हिल्स सोसायटीत विकी लोंढे हा पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह वास्तव्याला होता. या दोघांचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला असून त्यांना एक वर्षाची मुलगी देखील आहे. या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून सतत वाद होत होते. याच वादातून मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास विकी याने त्याच्या पत्नीवर चाकूने वार करत गळा चिरून तिची हत्या केली आणि घरातून पसार झाला. याबाबत रात्रीच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.

प्रथमदर्शनी चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.  पतीने कोणत्या  कारणावरुन पतीची हत्या केली हे अद्याप समोर आलेले नाही. आरोपीच्या शोधीसाठी  पथक रवाना झाले आहे.  या घटनेनंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आला आहे.

Web Title: Love marriage three years ago, suspecting the wife’s character

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here