Home नाशिक प्रेमविवाह , सतत मोबाईल बघते म्हणून सासूकडून छळ, महिन्यातच विवाहितेचं टोकाचं पाऊल

प्रेमविवाह , सतत मोबाईल बघते म्हणून सासूकडून छळ, महिन्यातच विवाहितेचं टोकाचं पाऊल

Breaking News | Nashik Crime : लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच विषारी औषध घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस.

Love marriage some month women suicide

नाशिक:  नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नाशकात प्रेमविवाह केलेल्या 21 वर्षीय विवाहितेला घरातील काम नीट करत नाही, जास्त बोलत नाही, सारखे मोबाईल बघते म्हणून सासूकडून छळ सुरू होता. यात पती लक्ष देत नसल्याने एकाएकी पडलेल्या विवाहितेने टोकाचं पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच विषारी औषध घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासू विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अधिक माहिती अशी की,  या प्रकरणी संशयित पतीसह सासूला अटक करण्यात आली आहे. विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 27 मे रोजी भाग्यश्रीने आईला फोन करत सासू आणि पती सारखे बोलतात, पती बाजू घेत नाही, मी एकाएकी पडले आहे, असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर त्याच रात्री नऊ वाजता तिने विषारी औषध घेतल्याची माहिती महिलेच्या सासरच्यांकडून कळाली. या घटनेनंतर तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Breaking News: Love marriage some month women suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here