Home जळगाव प्रेम तोडले तर फोटो व्हायरल, प्रियकराची धमकी, तरुणीने गळफास घेत आत्महत्या

प्रेम तोडले तर फोटो व्हायरल, प्रियकराची धमकी, तरुणीने गळफास घेत आत्महत्या

Jalgaon Crime: २३ वर्षीय युवकाच्या धमकीमुळे बदनामीच्या भीतीने १७ वर्षीय मुलीने २९ मार्चला गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

love breaks up, photos go viral, boyfriend threatens, young girl commits suicide

जळगाव: प्रेमसंबंध तोडले तर फोटो व्हायरल करेन, अशा २३ वर्षीय युवकाच्या धमकीमुळे बदनामीच्या भीतीने १७ वर्षीय मुलीने २९ मार्चला गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी जामनेर तालुक्यातील पहूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

शुक्रवारी सायंकाळी संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एका गावात १७ वर्षीय युवती व आहे. २३ वर्षीय तरुणात प्रेमसंबंध होते. दोघांचे मोबाइलवरील संभाषण युवतीच्या नातेवाइकांच्या निदर्शनास आले. नातेवाइकांनी तिला विश्वासात घेऊन प्रकरण जाणून घेतले. यानंतर दोघांमधील प्रेमप्रकरण संपुष्टात आले. मात्र, तरुण तिला वारंवार धमकी देत होता. प्रेमसंबंध तोडले तर माझ्यासोबतचे तुझे फोटो व्हायरल करेन, या धमकीने भीतीपोटी युवतीने गळफास घेतला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: love breaks up, photos go viral, boyfriend threatens, young girl commits suicide

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here