Home सोलापूर गावातील महिलेशी प्रेमसंबंध, आईचा विरोध; प्रेयसीच्या सोबतीने जन्मदात्या आईलाच संपवलं

गावातील महिलेशी प्रेमसंबंध, आईचा विरोध; प्रेयसीच्या सोबतीने जन्मदात्या आईलाच संपवलं

Solapur Crime News : प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलाने हत्या केल्याची घटना.

Love affair with a village woman, mother opposed lover's companion killed.jpeg

सोलापूर: नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलाने हत्या केल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर येथे घडली आहे. भिमाबाई हनुमंत कळसकोंडा असे मृत महिलेचे नाव आहे.  या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात रमेश कळसकोंडा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, रमेश कळसकोंडा याचे गावातील एका महिलेसोबत प्रेम प्रकरण होते. त्या प्रेम प्रकरणाला आई भिमाबाई कळसकोंडा यांचा विरोध होता. रमेश कळसकोंडा आणि आई भिमाबाई यांच्यात या प्रकरणामुळे सतत वाद होत होते.

त्यामुळेच प्रेयसी सोबत संगनमत करून रमेश कळसकोंडा याने गावाजवळील शेतात भिमाबाई कळसकोंडा यांचा त्यांच्यात साडीने गळा आवळून खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात रमेश कळसकोंडा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Love affair with a village woman, mother opposed; lover’s companion killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here