नाशिक हादरले! २५ किमी परिसरात जोरदार आवाज; घरांच्या काचा फुटल्या, लोक घाबरले, भूकंप की आणखी काही
Breaking News | Nashik: नाशिक हादरले! आवाज इतका भयंकर होता की, यामुळे काही घरांच्या काचा देखील फुटल्या. परंतु, हा आवाज नेमका कशाचा होता.
दिंडोरी: दिंडोरीसह आसपासच्या २५ किमी परिसरात दुपारच्या सुमारास अचानक जोरदार आवाजाने आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा आवाज इतका भयंकर होता की, यामुळे काही घरांच्या काचा देखील फुटल्या. परंतु, हा आवाज नेमका कशाचा होता याची सुरुवातील कुठलीही माहिती मिळालेली नव्हती. यानंतर तलाठी, तहसीलदार आणि पोलिसांनी तपास केल्यानंतर वेगळीच माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा आवाज नाशिकच्या ओझर येथील लढाऊ विमानांच्या कारखान्यात तयार होणाऱ्या सुखोई विमानाचा होता. हिंदुस्थान अरोनॉटिक्स लिमिटेडकडून ही विमाने तयार केली जातात. त्यात सुखोई या लढाऊ विमानाच्या सरावाचा हा आवाज होता. सरावावेळी विमान जमिनीच्या अगदी जवळून अवकाशात उडत गेले. ज्यामुळे प्रचंड मोठा आवाज झाल्याने दिंडोरी भागातील काही घरांच्या काचा फुटल्या तर काहींना हादरा बसल्याचे, त्यांनी सांगितले.
तसेच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले की, “संबंधित प्रकाराबाबत एचएलएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलिसांनी माहिती घेतली. त्यात सुखोई विमानाचा सॉनिक बूम झाल्याने आवाज येतो. ध्वनीच्या वेगापेक्षा हा अधिक वेगाने सुखोई विमान हवेत उडते. त्यावेळी हा आवाज येतो. या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याची शक्यता आहे. दिंडोरीत हेच घडले असावे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. या भागात कुठलीही दुर्घटना घडली नाही. विमान जमिनीच्या जवळून गेल्याने मोठा आवाज झाला. याप्रकरणी अधिक तपास करत असून, कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही”, असे त्यांनी म्हटले.
Breaking News: Loud noise in 25 km area; Glass of houses shattered, people panicked, earthquake