सिनेमा स्टाईलने केली महिलेची लूट
श्रीगोंदा: तालुक्यातील काष्टी येथे शनिवार दि.२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने महिलेला आपण पोलीस असुन, तुमचा भावाचा अपघात झाला आहे. असे सांगत दुचाकीवर बसवुन नेऊन तिला मारहाण करत , त्या महिलेचा मानेवर दुचाकी घालुन तिच्या जवळील एक लाख, दहा हजार रुपयांचा साडेचार तोळयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
याबाबत सीमा अनिल बंडगर. भिगवण ता. इंदापुर या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवसाढवळया घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या आगोदर पण तालुक्यातील चांडगाव येथील महिलेला अशाच प्रकारे बनावट पोलिसाने लुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आजच्या प्रकारची श्रीगोंदा पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत सदर आरोपींच्या शोधासाठी वेगाने तपासचक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत अशी आहे कि, भिगवण येथे राहणाऱ्या सीमा अनिल बंडगर या शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास खरातवाडी , काष्टी येथे माहेरी येत होत्या. त्या का काष्टी अजनुज चौकात उतरुन फळे घेत असताना, एक अनोळखी व्यक्ती त्यंच्याजवळ आला व त्यानें आपण पोलीस असुन, तुमच्या भावचा अपघात झाला आहे. साहेब दौंडकडुन येत असुन, तुम्हाला तिकडे बोलावले आहे. यामुळे तुम्ही माझ्यासोबत चला, असे सांगुन त्या महिलेकडुन तिचा मोबाईल काढुन घेत. तिला दुचाकीवर बसवुन दौंड रस्याने घेऊन गेला. शांताई मंगल कार्यालयाजवळ गेल्यानंतर त्या महिलेने आपण इथेच थांबु असे सांगितले. परंतु सदर इसमाने साहेबांची गाडी पुढे असल्याचे सांगुन या महिलेला दौंड रस्त्यावरील आत खडी क्रशरजवळ नेले.
येथे खडीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला या महिलेला मारहाण करत, तिच्या बॅगेतील जवळपास साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने काढुन घेत. त्या महिलेला खाली पाडून तिच्या मानेवर दुचाकी घातली. या घटनेबाबत सीमा बंडगर यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात येऊन दिेलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.