Murder Case: काका पुतण्याने मिळून केला लोणीतील त्या महिलेचा खून
लोणी | Murder Case: शेजारी राहात असल्याने महिलेशी झालेल्या किरकोळ वादातून तिची लोणीच्या हॉटेल पाकीजात निर्घृण हत्या करणारे काका-पुतण्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी 24 तासात आरोपी जेरबंद केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. मुख्य आरोपी हा लोणी-बाभळेश्वर रस्त्यावरील एका हॉटेलमधील वेटर आहे.
सोमवारी रात्री लोणी बुद्रुक ता. राहाता येथील संगमनेर रस्त्यावरील हॉटेल पाकीजा मधील कामगार महिला रंजना विश्वनाथ मोहिते हिचे धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. सदर महिला हॉटेल मध्ये एकटीच राहात असल्याने आरोपी शोधून काढणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. मात्र पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, मोबाईल सेल यांच्या मदतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे आणि लोणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी 24 तासात आरोपी शोधून त्यांना जेरबंद केले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी भारत तुकाराम लष्करे, वय 22 वर्षे, मुळगाव चक्कर गल्ली ,बायपास रोड, धुळे हा लोणी-बाभळेश्वर रस्त्यावरील एक हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करीत होता. तो पाकीजा हॉटेल जवळच राहायला होता. त्याचे आणि रंजनाचे किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्याचा राग डोक्यात ठेऊन आरोपी भारतने त्याचा अल्पवयीन पुतण्याला लोणीत बोलावून घेऊन रंजनाची निर्घृण हत्या केली. हॉटेल लोखंडी पळा त्याने हत्यार म्हणून वापरला. पुतण्याने रंजनाला पकडून ठेवले आणि काकाने तिच्यावर वार करून तिचा खून केला असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
Web Title: Loni murder of that woman in Butter