Home अहमदनगर नगर व शिर्डीत कोण मारणार बाजी? विविध Exit Poll मध्ये धक्कादायक अंदाज

नगर व शिर्डीत कोण मारणार बाजी? विविध Exit Poll मध्ये धक्कादायक अंदाज

Loksabha Election 2024: नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुतीला पराभव स्वीकारावा लागेल अशी शक्यता.

Loksabha Election 2024 Who will beat Nagar and Shirdi

अहमदनगर: देशातील लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपताच विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळणार नाही असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यातच नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुतीला पराभव स्वीकारावा लागेल अशी शक्यता आहे.

टिव्ही ९ च्या अंदाजानुसार नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील पिछाडीवर असून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके विजयी होण्याची शक्यता आहे.

तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पराभूत करतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानानंतर विविध माध्यमांचे एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असून आहे. टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे हे पिछाडीवर असल्याचे दिसून येते. मात्र हा एक्झिट पोल असून अंतिम निकाल हा चार जून रोजी जाहीर होणार आहे.

TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 22 जागा आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अपक्षाला एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अहमदनगरमध्ये निलेश लंके आघाडीवर आहेत.

डॉ. सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार आहे. आता अहमदनगरमध्ये नक्की कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Loksabha Election 2024 Who will beat Nagar and Shirdi

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here