तुमच्या मतदार संघात मतदान केव्हा? जाणून घ्या Lok Sabha Elections 2024
Lok Sabha Elections 2024: देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार, महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.
Lok Sabha Election: अखेर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे. देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. देशात 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 दरम्यान मतदान पार पडणार आहे. तसेच 4 जून 2024 ला मतमोजणी पार पडणार असून लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल.
देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक
पहिला टप्पा : 19 एप्रिल 2024
दुसरा टप्पा : 26 एप्रिल 2024
तिसरा टप्पा : 7 मे 2024
चौथा टप्पा : 13 मे 2024
पाचवा टप्पा : 20 मे 2024
सहावा टप्पा : 25 मे 2024
सातवा टप्पा : 1 जून 2024
विविध राज्यांतील लोकसभा निवडणुकीच्या तारखा : 19 एप्रिल ते 1 जून
महाराष्ट्र : 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी पाच टप्प्यात मतदान
राजस्थान : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात 19 आणि 26 एप्रिल रोजी मतदान
उत्तर प्रदेश : 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी सात टप्प्यात मतदान
दिल्ली : 25 मे रोजी मतदान
मध्य प्रदेश : 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे आणि 13 मे रोजी चार टप्प्यांत मतदान
मणिपूर : 19 आणि 26 एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान
कर्नाटक : 26 एप्रिल आणि 7 मे रोजी दोन टप्प्यात मतदान
पंजाब : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान
हिमाचल प्रदेश : सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान
ओदिशा : 13 मे, 20, 25 आणि 1 जून रोजी चार टप्प्यांत मतदान
झारखंड : 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी मतदान
हरियाणा : सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान
उत्तराखंड : पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान
पश्चिम बंगाल : 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान सात टप्प्यांत मतदान
आसाम : 19, 26 एप्रिल आणि 7 मे रोजी मतदान
गुजरात : 7 मे रोजी मतदान
महाराष्ट्रात मतदारसंघनिहाय मतदान तारखा पुढील प्रमाणे
- पहिला टप्पा – 19 एप्रिल रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
- दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
- तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
- चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
- पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
web Title: Lok Sabha Election 2024 Timetable
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study