Home संगमनेर संगमनेरात जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

संगमनेरात जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

Brealking News | Sangamner: जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा, १४ लाख २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

Local Crime Branch raids gambling den in Sangamner

नगर : संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून १४ जुगाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडून १४ लाख २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नावे

अजीज अबु शेख (वय-४५ रा.तळेगांव दिघे ता.संगमनेर), आकाश बाबासाहेब गडाख (रा. पारेगाव बु, ता. संगमनेर), योगेश दत्तात्रय राहटळ (रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर), भास्कर बाबुराव पगार (रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर), महेंद्र सुंदरलाल पाटणी (रा. तळेगांव दिघे ता. संगमनेर), कैलास कारभारी मळे (रा. काकडवाडी ता.संगमनेर), नंदू म्हतू पिंगळे (रा. तळेगांव दिघे ता. संगमनेर), इरफान युनिस शेख (रा. लोणी (हसनापुर) ता.राहाता), आशिफ कासम शेख (रा. करोले ता. संगमनेर), रवींद्र विठ्ठल जेजुरकर (रा. ममदापुर ता. राहाता), एकनाथ रोहीदास जोरवेकर (रा. पोरेगाव ता. संगमनेर), विलास भास्कर जगताप (रा. तळेगांव दिघे ता.संगमनेर), दशरथ बिरु कांदळकर (रा. वज्रडी बु ता. संगमनेर), विजय रंभाजी ढवळे (रा.पारेगाव संगमनेर), असे ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नावे आहेत.

अवैध जुगार सुरु असल्याची खात्रीशीर माहिती  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यात तळेगाव ते नादुर शिंगोटे रस्त्यावरील एका घरात अवैध जुगार सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, आकाश काळे, रमिझराजा आतार यांच्या पथकाने केली.

Breaking News: Local Crime Branch raids gambling den in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here