Home नागपूर ‘लिव्ह इन’ प्रेयसीच्या मुलास रेल्वेत दिले सोडून दिले

‘लिव्ह इन’ प्रेयसीच्या मुलास रेल्वेत दिले सोडून दिले

Breaking News | Nagpur Crime: लिव्ह इनमध्ये एका महिलेसोबत राहत असताना तिचा साडेचार वर्षांचा बालक अडसर वाटू लागल्याने प्रियकरानेच बालकाला वर्ध्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीत सोडून दिले.

Live-in' lover's son was given away in the train

नागपूर : लिव्ह इनमध्ये एका महिलेसोबत राहत असताना तिचा साडेचार वर्षांचा बालक अडसर वाटू लागल्याने प्रियकरानेच बालकाला वर्ध्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीत सोडून दिले. दरम्यान, गणेशपेठ पोलिस आणि गुन्हे शाखा पोलिसांनी बालकाला सुखरूप नागपुरात आणून आरोपीला गजाआड केले.

हंसराज ज्ञानेश्वर दखने (२५, रा. पोरा, जि. भंडारा) असे आरोपीचे नाव आहे. एका ३० वर्षीय महिलेचे पतीसोबत पटत नसल्यामुळे ती विभक्त राहते. महिनाभरापूर्वी महिलेची आरोपीसोबत ओळख झाली. त्यांच्यात प्रेम झाले व ते लिव्ह इनमध्ये राहू लागले. आरोपीने महिलेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. परंतु तिने आपल्या मुलासह स्वीकार करण्याची अट घातली. मुलगा आरोपीस अडसर वाटू लागल्याने त्याने बालकापासून सुटका करून घेण्याचा बेत आखला.

Web Title: Live-in’ lover’s son was given away in the train

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here