लहान भाच्याचे भांडण सोडवले अन् काही मिनिटातच मामांचा मृत्यू
Aurangabad Crime: गेलेल्या मामाचा भांडण सोडविण्याच्या काही मिनिटातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना.
छत्रपती संभाजीनगर: लहान भाच्याचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मामाचा भांडण सोडविण्याच्या काही मिनिटातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा परिसरात घडली. शेजाऱ्याच्या मारहाणीत हा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दशरथ अंबादास रोकडे (४०,रा.मोतीवाला कॉलनी, चिकलठाणा) असे मृताचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दशरथ यांच्या घराशेजारी त्यांची बहीण राहते. दरम्यान, सोमवारी दुपारी जेव्हा ते घरी आले. तेव्हा त्यांचा लहाना भाचा व एका लहान मुलाचे भांडण सुरु होते. त्यांनी त्या लहान मुलांची भांडणे सोडविली. दरम्यान तेथे वाद झाला.
भांडण सोडविल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना घरच्यांनी रुग्णालयात घेऊन नाही मात्र तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सिडको एम.आय.डी.सी. ठाण्यात आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करित आहेत.
दशरथ हे लहान मुलांचे भांडण सोडविण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांना बेदम मारहाण झाली त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप दशरथ यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदनाचे अंतिम अहवाल प्राप्त झाल्यावर त्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
Web Title: little nephew’s quarrel was resolved and the uncle died within a few minutes
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App