संगमनेर: दारुचा ट्रक पलटी झाल्याने खोक्यांची केली पळवापळवी
Breaking News | Sangamner: तब्बल एक हजाराहून अधिक खोके पळवल्याची माहिती समोर.
संगमनेर: वडगाव लांडगा येथे दारुने भरलेला ट्रक ( एच.१२, एल. पलटी झाल्याने एकच झुंबड उडाली. तब्बल एक हजाराहून अधिक खोके पळवल्याची माहिती समोर येत आहे. ही सर्व घटना शुक्रवारी (दि. २७) पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी, की विदेशी दारुचा ट्रक संगमनेर मार्गे चालला होता. दरम्यान, ट्रकचालकाचा मॅप चुकल्याने तो गणोरे मार्गे गेला. मात्र, त्या चालकाचे संतुलन सुटले आणि ट्रक रस्त्यावरून एका खड्डुचात जाऊन पलटी झाला. हे पाहताच चालकाने उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र, गाडी चालक तालुक्यातील हा घटनास्थळावरून फरार झाला. ही सर्व घटना तेथील क्र. एम. काही नागरिकांनी पहिली. या (टी.७३२९) ट्रकला कोणी वाली राहिलेले लोकांनी नाही हे पाहून परिसरातील नागरिकांनी डाव साधला.
दरम्यान, सकाळी सकाळी दूध घालण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील दारुचे खोके नेले. तर काहीजण खोके घेऊन पसार झाले. जेव्हा ही घटना पोलिसांना समजली तोपर्यंत ट्रॅकमधील सर्व खोके गायब झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असता त्यांच्या हाती फक्त शंभर खोके लागले. सकाळपासून ते रात्रभर शोध मोहीम सुरू ठेऊन किती खोके हाती लागतात याकडे लक्ष लागले आहे.
Web Title: liquor truck overturned, the boxes ran away
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study