Breaking News | Ahmednagar: रस्त्याने जाणाऱ्या दोन कारमधून देशी विदेशी दारूचा साठा जप्त.
श्रीरामपूर : शहर पोलिसांनी पुणतांबा रस्त्याने जाणाऱ्या दोन कारमधून देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोघा कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींकडून पाच लाख ४३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी चरणलाल मुरारीलाल राजपाल (वय ५६, तांबेचाळ, श्रीरामपूर) रा.इंदिरानगर, शिरसगाव) यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही कार पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजता ही कारवाई करण्यात आली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या व किशोर पावलस तांबे (वय ४७, पथकाने ही कारवाई केली.
Web Title: Liquor caught from the car
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study