संगमनेर तालुक्यात मंदिरावर वीज कोसळून मंदिर कोसळले
Sangamner Lightning struck: निमगाव पागा येथे मंदिरावर वीज कोसळून मंदिराचा कळस कोसळल्याची घटना.
संगमनेर (प्रतिनिधी | संजय साबळे): संगमनेर तालुक्यात निमगाव पागा येथे मंदिरावर वीज कोसळून मंदिराचा कळस कोसळल्याची घटना आज दि.१८ मंगळवार दुपारी घडली.
अचानक आलेल्या जोराच्या वादळी पावसात एका मंदिरावर वीज पडली या विजेची तीव्रता एवढी भयानक होती की काही क्षणात मंदिराचा घुमट कोसळला.
संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील पेमगिरी रोडवरील रेणुका माता मंदिरावर दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक वीज पडली
मेघ गर्जनेसह आलेल्या पावसात रेणुकामाता मंदिराच्या कळसावर वीज कोसळल्याने संपूर्ण घुमट निखळून पडला आहे. यामुळे मंदिरा चा दरवाजा तुटून 50 फूट लांब जाऊन पडला व कळसाचा सर्व भाग धाडकन कोसळला.
आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास परतीच्या पावसाने मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात केली. पावसाला सुरुवात होताच विजेच्या गडगडाट सुरू झाला अचानक पेमगिरी रोड येथील रेणुका मातेच्या मंदिरावर जोराची वीज कोसळल्याने रेणुका माता मंदिर उध्वस्त झाले .
परिसरामध्ये मंदिरालगत लोकवस्ती परंतु, कोणतीही जीवित हानी झाली नाही , मंदिर उद्ध्वस्त झाले असले, तरी देवीच्या गाभाऱ्यातील देवीची मूर्ती ही सुरक्षित असून, देवीच्या मूर्तीला व चौथर्याला कोणतीही हानी पोहचली नाही.
दरम्यान गेल्या काही दिवसापासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे सर्व शेती पिकांचे नुकसान झाले आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत आहे अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही.
Web Title: Lightning struck the temple and the temple collapsed