Home नाशिक मोठी बातमी! सिन्नरला बसस्थानकात कोसळली वीज, स्लॅबचा काही भाग कोसळला

मोठी बातमी! सिन्नरला बसस्थानकात कोसळली वीज, स्लॅबचा काही भाग कोसळला

Breaking News | Sinnar Bus Stand: सिन्नर बसस्थानकात वीज पडल्याने स्लॅब कोसळल्याची घटना.

Lightning strike at Sinnar bus stand, part of slab collapses

Sinner: राज्यात आज मान्सूनचे आगमन झाले असून, विविध जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील दमदार पाऊस बरसत असून, नद्या आणि नाल्यांना पूर आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र, या पावसाचा फटका सिन्नर बसस्थानकाला बसल्याची माहिती समोर आली आहे. काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

-मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर बसस्थानकात वीज पडल्याने स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. हा स्लॅब शिवशाही आणि एका खाजगी कारवर कोसळला आहे. ज्यामुळे खाली उभ्या असलेल्या शिवशाही बसचे मोठे नुकसान झाले आहे.

तुफानी पावसामुळे सिन्नरच्या हायटेक बसस्थानकाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण बसस्थानक रिकामा करण्यात आला आहे. तसेच प्रवाशांना देखील बाहेर काढण्यात आले आहे. तर या घटनेमुळे सिन्नर शहरातील सर्व रस्ते बंद झाले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे बसस्थानकातील सदर घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पंरतु, हा भाग नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप समजू शकलेले नाही.

महत्वाचे: नवनवीन अधिक बातम्या मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा. 

दरम्यान, हे बसस्थानक सिन्नरचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निधीतून उभारण्यात आलेले आहे. तसेच सध्या सिन्नर शहरात मुसळधार पाऊस सुरू असून, सरस्वती आणि देव नदीला पूर आल्याचे चित्र आहे.

Breaking News: Lightning strike at Sinnar bus stand, part of slab collapses

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here