अहिल्यानगर: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीच्या खूनप्रकरणी प्रियकरास जन्मठेप
Breaking News | Ahilyanagar: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या महिलेच्या पतीला जीवे ठार मारल्याप्रकरणी तिच्या प्रियकराला श्रीगोंदा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस, शेख यांनी दोषी धरून जन्मठेप व तेरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
जामखेड : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या महिलेच्या पतीला जीवे ठार मारल्याप्रकरणी तिच्या प्रियकराला श्रीगोंदा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस, शेख यांनी दोषी धरून जन्मठेप व तेरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
आरोपी कृष्णा संजय सुर्वे (वय १९, रा. खर्डा, ता. जामखेड) याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. ही बाब तिच्या पतीच्या लक्षात आली. त्याने पत्नी व आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेचा पती प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने आरोपीने १३ मे २०२२ रोजी मध्यरात्री त्याचा डोक्यात धारधार हत्याराने वार करुन निघृण खून केला. दुसऱ्या दिवशी मृताच्या भावाला घटनेची माहिती समजली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता भाऊ रस्त्याच्या बाजूला मृतावस्थेत पडलेला दिसला. त्याच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करून खून केला होता. याबाबत त्यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेचा पोलिसांकडून सखोल तपास करण्यात आला. तपासा दरम्यान मयताच्या पत्नीचे आरोपीसोबत अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेत साक्षीदारांनी दिलेले पुरावे, कागदपत्रे आणि परिस्थितीजन्य पुरावे आरोपीविरुद्ध गुन्हा शावित करण्याकामी सबळ व पुरेसे ठरले. खुनाचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी धरून आरोपीस जन्मठेप व १३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात फिर्यादीतर्फे सुमित पाटील यांनी, तर आरोपीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ घाणेकर व अनिकेत भोसले यांनी काम पाहिले.
Web Title: Life imprisonment for lover in case of murder of husband
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study