Home संगमनेर दहशतीचे झाकण उडाले; थोडे राहिले, पण….. आमदार बाळासाहेब थोरात

दहशतीचे झाकण उडाले; थोडे राहिले, पण….. आमदार बाळासाहेब थोरात

Breaking News | Sangamner Loksabha Election: दहशतीचे झाकण उडाले; थोडे राहिले, पुढे पाहू आमदार बाळासाहेब थोरात; भाजपच्या दहशतीला जनतेने नाकारल्याचा घणाघात.

lid of terror was blown Few remained, but..... MLA Balasaheb Thorat Lok sabha Election

संगमनेर : दहशतीचे झाकण आता उडाले आहे. थोडे बाकी आहे, तेही लवकरच उडवू, अशा शब्दांत आमदार बाळासाहेब थोरात यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. भाजपच्या दहशतीला जनतेचे नाकारल्याचेही ते म्हणाले. ‘यशोधन’ येथे ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयासमोर महाविकास आघाडी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला.

राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असून देशाच्या पातळीवरील सरकार विरोधात जनतेने मत नोंदविले आहे. मुळात राज्यात नवीन सरकार आले तोच चुकीच्या पद्धतीने पायंडे पाडण्याचा प्रयत्न केला. त्यालाही जनतेने विरोध केला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता भक्कमपणे उभी राहिली, असे मत थोरात यांनी व्यक्त केले.

थोरात म्हणाले, की शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भाऊसाहेब वाकचौरे हे कार्यकर्त्यांत राहणारे असून सतत संपर्कात होते. महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी चांगले काम मतदारसंघात केले.

अहमदनगर मतदारसंघातील नीलेश लंके यांच्या विजयाबाबत प्रतिक्रिया देताना थोरात म्हणाले, की नगरमध्ये नीलेश लंके यांचे नेतृत्व पुढे

महाविकास आघाडीला मोठा भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल आ.बाळासाहेब थोरात यांनी मतदार जनतेचे आभार मानले. आ. थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जिलेबी वाटत विजयोत्सव साजरा केला.

कसे आले, याचा विचार केला पाहिजे. ते स्वतः कार्यकर्ते आहेत. कोरोना काळात त्यांनी चांगले काम केले. दुसरीकडे सुजय विखे तरुण खासदार आहे. काही चुका त्यांच्याकडून झाल्या असतील. मात्र राधाकृष्ण विखे मंत्री झाल्यानंतर त्यांचे वागणे दहशतीचे होते. सत्तेचा गैरवापर ते करत होते. पारनेर तालुक्यातही प्रशासनाचा त्रास झाला. यातून लंकेंचे नेतृत्व पुढे आले. सर्व तालुक्यात विखे फिरले. दहशतीच्या राजकारणातून सरकार म्हणून दहशत निर्माण करायला गेले. पर्यायाने जनतेने लंकेंना पुढे आणले आणि विखेंना पराभवाला सामोरे जावे लागले.

Web Title: lid of terror was blown Few remained, but….. MLA Balasaheb Thorat Lok sabha Election

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here