Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात ३५ कृषी केंद्रांचे परवाने रद्द, दोन जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर जिल्ह्यात ३५ कृषी केंद्रांचे परवाने रद्द, दोन जणांवर गुन्हा दाखल

Breaking News | Ahmednagar: शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथक नेमून नजर ठेवली जात होती. अहमदनगर जिल्ह्यात भरारी पथकांकडून तपासणी करत त्रुटी आढळून आलेल्या ३५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित.

Licenses of 35 agricultural centers canceled in Ahmednagar 

अहमदनगर : हंगामाच्या सुरवातीपासून कृषी विभागाची नजर कृषी केंद्रांवर आहे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथक नेमून नजर ठेवली जात होती. अहमदनगर जिल्ह्यात भरारी पथकांकडून तपासणी करत त्रुटी आढळून आलेल्या ३५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. बाजारपेठेत कपाशी, सोयाबीन यासह कडधान्य पिकांच्या बियाणांना मोठी मागणी आहे. यामुळे बियाणांचा काळाबाजार करत चढ्या दराने विक्री केली जात आहे. याबाबतच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. कृषी विभागाला प्राप्त तक्रारीनुसार आणि अचानक भेटीद्वारे कृषी विभाग कृषी केंद्राची तपासणी करण्यास सुरवात केली.

कृषी विभागाच्या भरारी पथकांकडून तपासणी करत गेल्या महिनाभरात ३५ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच १३ पेक्षा अधिक केंद्रांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. यासह जिल्ह्यात २ ठिकाणी थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात १५ भरारी पथकाची स्थापना देखील करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी दिली आहे.

Web Title: Licenses of 35 agricultural centers canceled in Ahmednagar 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here