Home संगमनेर हसून दुसऱ्याची जिरविणे एवढेच काम संगमनेरच्या नेत्यांनी केले- राधाकृष्ण विखे पाटील

हसून दुसऱ्याची जिरविणे एवढेच काम संगमनेरच्या नेत्यांनी केले- राधाकृष्ण विखे पाटील

Sangamner Assembly Election 2024 | Balasaheb Thorat vs Radhakrishana Vikhe Patil: केवळ हसून दुसऱ्याची जिरविणे एवढेच काम संगमनेरच्या नेत्यांनी आजपर्यंत केले असल्याचा टोला महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. बाळासाहेब थोरात यांना लगावला.

leaders of Sangamner did nothing but laugh and make others live - Radhakrishna Vikhe Patil

संगमनेर: महाविकास आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्रीच खूप तयार झाले आहेत. काहींनी तर स्वतःचे फ्लेक्सबोर्ड लावून मीच मुख्यमंत्री म्हणून मिरवून घेतले. जनतेला पाणी मिळवून द्यायचे नाही पण जलनायक म्हणून मिरवून घ्यायचे, ही यांची भूमिका आहे. अनेक वर्ष कोणतीही विकास कामे संगमनेर तालुक्यात झाली नाही. केवळ हसून दुसऱ्याची जिरविणे एवढेच काम संगमनेरच्या नेत्यांनी आजपर्यंत केले असल्याचा टोला महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. बाळासाहेब थोरात यांना लगावला.

तालुक्यातील चिंचपूर आणि निमगावजाळी या गावांमध्ये आयोजित केलेल्या प्रचार सभेत मंत्री विखे पाटील बोलत होते. वर्षानुवर्षे आ. थोरातांकडे सत्तास्थान होती. निळवंडेच्या प्रश्नावरुन त्यांनी अनेक निवडणुका जिंकल्या. पण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत त्यांना पाणी आणता आले नाही. कालव्यांची कामे राहाता तालुक्यातील भागामध्ये होऊ द्यायची नाहीत, हीच त्यांची भूमिका होती. उजच्या कालव्याच्या कामाचा ठेकाही त्यांचे बंधू इंद्रजित थोरात यांच्याकडेच होता.

महायुती सरकार आल्यानंतर धरणाच्या मुखापासून कालव्यांची कामे सुरू झाली. मात्र जाणीवपूर्वक उजव्या कालव्याचे काम अडकवून ठेवले होते. या भागात काम झाली तर याचे श्रेय विखे पाटलांना मिळेल म्हणूनच काम होवू दिली जात नव्हती. परंतु कालव्यांच्या कामासाठी ठेकेदारांनी निर्माण केलेले अडथळे दूर करावे लागले. अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून यातून मार्ग काढला. त्यानंतर प्रत्यक्ष पाणी या कालव्यांमधून शेतकऱ्यांना आपण मिळवून देवू शकलो. राज्य सरकारने मागील अडीच वर्षात घेतलेल्या सर्व योजनांचा लाभ नागरीकांना मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. या योजनांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आता महाविकास आघाडीकडून सुरु आहे. आमच्याच योजनांची नावे घेवून प्रसिध्द केलेला जाहिरनामा ही फक्त धुळफेक असून त्यांचे सरकारच येणार नसल्यामुळे जनताही त्यांच्या योजनांवर विश्वास ठेवणार नाही.

Web Title: leaders of Sangamner did nothing but laugh and make others live – Radhakrishna Vikhe Patil

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here