Home अकोले अकोले तालुक्यात तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

अकोले तालुक्यात तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

अकोले: अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथे एक शेतमजुराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १३ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. कृष्णा रमेश देठे असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

कृष्णा हा बुधवारी सकाळी उठून गावातील काही तरुणांसोबत नदीवर पोहण्यासाठी गेला होता. यावेळी पोहताना तो अचानक भोवऱ्यात सापडला आणि बऱ्याच वेळ वरती आलाच नाही. ही बातमी गावात समजलेली असता त्यांनी नदीकडे धाव घेतली. तरुणानी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो मिळाला नाही. अखेर उशिराने तो मिळून आला. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  कृष्णा हा हॉटेल, कंपनी, मजूर म्हणून काम करीत असून आपली उपजीविका करीत असे. कृष्णा याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  

वाचा: अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाउस

वाचा: संगमनेर: गावात प्रवेश न दिल्याने महिला सरपंचाना मारहाण

Website Title: Latest News youth drowned in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here