Home अहमदनगर गावात बाहेरून येणाऱ्यांवर नजर, गावोगावी करोना ग्रामसुरक्षा समिती

गावात बाहेरून येणाऱ्यांवर नजर, गावोगावी करोना ग्रामसुरक्षा समिती

अहमदनगर: करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाहेरून गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घेतली जाणार आहे. त्यासाठी गावपातळीवर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली करोना ग्रामसुरक्षा समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे. या समितीचे सचिव म्हणून पोलीस पाटील काम पाहणार आहे. तलाठी व ग्रामसेवक सदस्य असणार आहे. जेथे पोलीस पाटील नाहीत अशा ठिकाणी ग्रामसेवक सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

सध्या ग्रामीण भागातून ऊसतोड कामगार, परराज्यातील नागरिक, पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, भाविक, पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. यामध्ये गावातील व्यक्ती, गावाबाहेरील व्यक्ती, गावातील व्यक्तीचे नातेवाईक, मित्र, हितचिंतक यांचा समावेश आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने बाहेरून गावात येणाऱ्या  व्यक्तींपासून संभाव्य धोका टाळण्यासाठी गावपातळीवर समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read: Salman Khan Upcoming Movies 2020 and 2021

गावात येणाऱ्या प्रत्येक  नागरिकांवर ही समिती लक्ष ठेवणार असून, समितीला जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे. बाहेरून गावात वास्‍तव्‍यास येणाऱ्या व्‍यक्‍तींना परवानगी नसल्‍यास गावात प्रवेश देऊ नये, परवानगी असल्‍यास तहसीलदारांना माहिती दिल्यानंतरच गावात प्रवेश द्यावा,  बाहेरून गावात वास्‍तव्‍यास आलेल्‍या व्‍यक्‍तींचे नाव व इतर सविस्‍तर तपशील यांची नोंद समितीच्या सदस्‍य सचिवांनी ठेवावी,  बाहेरून गावात वास्‍तव्‍यास आलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी संस्‍थात्‍मक विलगीकरणासाठी इमारत (उदा. जिल्‍हा परिषद शाळा, अंगणवाडी भवन) निश्चित करून ठेवावी,  संबंधित व्‍यक्‍तींची व इमारतीची देखभाल व सुरक्षा संबंधित ग्रामपंचायतीने करावी.

बाहेरून गावात वास्‍तव्‍यास आलेल्‍या व्‍यक्‍तींची आरोग्‍य विभागामार्फत तत्‍काळ तपासणी करून घ्यावी. बाहेरून गावात वास्‍तव्‍यास आलेल्‍या व्‍यक्‍तींचे पुढील १४ दिवसांसाठी संस्‍थात्‍मक विलगीकरण बंधनकारक राहील. तसेच संबंधितांच्‍या हातावर शिक्‍के मारण्‍यात यावेत,  असेही आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Website Title: Latest news Village Corona Village Security Committee

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here