अकोले: मुलींची छेडछाड करणाऱ्या शिक्षकास महिलांकडून चपलाने मारहाण
अकोले: तालुक्यातील वाघापूर येथील गंभीर वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नराधम शिक्षकाने अनेक मुलींवर अत्याचार केले असल्यामुळे आज वाघापूर येथील ग्रामस्थ एकत्र येऊन येथील एका शिक्षकाने अनेक मुलींची छेडछाड व गलिच्छ प्रकार केल्याचे उघडकीस आले त्यामुळे या भागांमध्ये शिक्षण क्षेत्राविषयी आता वेगळी चर्चा सुरू झाली आहे
दत्तू पांडुरंग पिचड असे या शिक्षकाचे नाव आहे. महिन्यांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघापूर गंभीरवाडी येथे अनेक मुलींची छेडछाड करणारा हा शिक्षक अनेक वेळा समज देऊन देखील या शिक्षकाने शाळेतील मुलींविषयी प्रकार केले तरी अकोले तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार या भागात घडला असून याविषयी शिक्षणाधिकारी काय भूमिका घेणार तर दुसरीकडे संतप्त ग्रामस्थांनी या शाळेला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
गावातील महिलांकडून व गावकरी यांच्याकडून या शिक्षकास चोप देण्यात आला आहे. महिलांकडून चपलाने मारहाण करण्यात आली आहे असा व्हिडियो सोशियल मेडीयावर व्हायरल होत आहे.
Website Title: Latest News Vaghapur ZP School