दोन किराणा दुकान फोडून ७० हजारांचा ऐवज लांबविला
श्रीरामपूर: शहरातील बाजारतळावरील दोन किराणा दुकाने फोडून दुकानांतून ७० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
बाजारतळावर नगरपरिषद शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये कांकरिया यांच्या शैलेश किराणा दुकानाचे मागील बाजूचे शटर उचकाटाऊन कटावणीने वाकवून दुकानातील सुमारे ४० हजार रुपयांचा किराणा माल चोरून नेला आहे. सीसीटीव्ही कॅमेरावर कपडा टाकून चोरी शुक्रवारी रात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास ही चोरी झाली.
श्रीरामपूर संगमनेर रोडवरील महावीर पापडीवाल यांच्या संतोष किराणा या दुकानातील मागील बाजूचे पत्रे चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी तेल, तुपाचे बॉक्स, चणाडाळ, साखर साबण असा सुमारे ३० हजारांचा माल चोरून नेला आहे. चोरटे रेल्वेलाईन पार करून पलीकडे गेले. रेल्वेलाईनजवळ हरभरा डाल दिसल्याचे लक्षात आले. या दोघांनी दुकान चोरी प्रकरणी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
Website Title: Latest News two grocery stores and stole