Home अहमदनगर Latest News: अहमदनगर रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक

Latest News: अहमदनगर रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक

अहमदनगर: जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे दारू विक्रीचे दुकाने बंद असली तरी रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक होत असल्याचा धाक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा रुग्णालातील कर्मचारी वसाहत परिसरातूनच ही तस्करी होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे.

पोलिसांनी दारूची तस्करी करणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकासह दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विदेशी दारूसह एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्या माहितीनुसार बुधवारी दुपारी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके व तोफखाना पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक किरण सुरसे, कृष्णा घायावट व समाधान सोळंके यांच्या पथकाने जिल्हा रुग्णालयातील सिल्वर कोर्टर येथील पाण्याच्या टाकीजवळ सापळा लावला.

यावेळी या परिसरात दोघेजण एका दुचाकीवर येत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तपासणी केली त्यावेळी त्याच्याकडे विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या यावेळी पोलिसांनी गाडीवरून विरू प्रकाश गोहेरे व रॉबिन जॉर्ज कोरेरा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा या दोघांनी रुग्ण वाहिकेचे चालक संजय गंगाराम हंकारे यांच्याकडून ही दारू घेतल्याचे सांगितले यावेळी पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात परिसरात जाऊन हंकारे हा चालवत असलेला रुग्णवाहिकेची तपासणी केली असता विदेशी दारूचा बॉक्स आढळून आला. या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Website Title: Latest News Transportation of liquor by Ahmednagar ambulance

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here